घुंगराळा ता.नायगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करावी

30

🔹राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.10डिसेंबर):-नायगाव तालुक्यातील घुंगराळा हे गाव नांदेड हैद्राबाद राज्यमहामार्गावरील गाव असुन या गावाशी आजुबाजुच्या पंधरा गावांतील शेतकरी,व नागरिक यांचा रोजचा संपर्क आहे त्यामुळे याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता आहे.त्याकरिता घुंगराळा या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी अर्थमंत्री अजीतदादा पवार साहेब यांच्याकडे केली.

घुंगराळा येथे बँक स्थापन क केल्यास आजुबाजुच्या वंजरवाडी,रुई,सावरखेड,गंगणबीड,रानसुगाव,ताकबीड,निळेगव्हाण,आंतरगाव ,देगाव,हिप्परगा,ईज्जतगाव या गावातील शेतकरी व नागरिकांना याचा फ़ायदा होईल व बँकेचे व्यवहार करण्यास सोईस्कर होईल अशी घुंगराळ्यासह ईतर गावातील नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली.