नायगाव तालुक्यात तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या आशीर्वादाने होत असलेली अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करा – विक्रम पाटील बामणीकर

38

🔸जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.11डिसेंबर):- तालुक्यात गेल्या काही दिवसापासून दिवसा व रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक व गौण खनिज चोरीच्या मार्गाने होत असून हे अवैध वाहतूक तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या आर्थिक व्यवहारामुळे होत आहे त्यामुळे नायगाव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवराज्य युवा संघटना जिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून कोकलेगाव कुंटूर मार्गावर अनेक रेतीचे हायवा टिप्पर अवैद्य वाळू घेऊन जाताना दिसून येत आहेत पण याकडे मात्र महसूल विभाग बघण्याची भूमिका घेत आहे त्यातच नायगाव तहसील कार्यालयातर्फे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाईसाठी फिरते पथक देखील नेमण्यात आले असून हे पथक नावापुरतेच उरले आहे त्यामुळे रेती वाहतूक करा आधा तुम्हारा आधा हमारा ?
अशी अवस्था नायगाव महसूल विभागाची झाली आहे नायगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारचा रेती घाटाचा लिलाव झाला नसतानाही मग नायगाव तालुक्यात अवैध रेती वाहतूक व रेती कुठून येते ? याचेदेखील महसूल प्रशासनाला माहिती नाही त्यामुळे नायगाव तालुक्यात महसूल विभाग आहे.

की नाही असे या भागातील सामान्या नागरिक बोलून दाखवत आहेत त्यामुळे दररोज हजारो ब्रास अवैध रेती वाहतूक चोरीच्या मार्गाने विक्री केली जात आहे यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून त्यात अधिकाऱ्यांचे खिसे भरले जाते त्यामुळेच अवैध वाहतूकीकडे तहसीलदार व मंडळाधिकारी तलाठी हे दुर्लक्ष करत आहेत नायगाव तालुक्यातील गोदाकाठच्या शेतामध्ये वाळू साठा आढळून आल्यास संबंधिता विरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८७ व (८) अनवे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी तसेच ज्या शेत जमिनीत वाळूसाठे केले आहेत.

अशा शेतकऱ्यावर फौजदारी स्वरूपाची व पर्यावरण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा नायगाव तालुक्यात सर्रास अवैध रेती वाहतूक होत असून या वाहतुकीला नायगावचे फिरते पथक हे नावापुरते ते उरले असून ते अवैध वाहतूक होत असताना उघड्या डोळ्याने त्यांच्या समोरून अवैध वाहतूक करणारे रेतीचे टिप्पर जात असतात पण ते कोणतीही कारवाई करत नाहीत.

अवैध वाहतूक तात्काळ बंद करून संबंधित तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या विरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई देखील करण्यात यावी अशा मागणीसाठी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.