✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697
माजलगाव(दि.11डिसेंबर):- गेवराई शहरातील सरकारी जागेवरील अतिक्रमण धारकांना जागेची मालकी हक्क (PTR) मिळावेत तसेच संजयनगर गेवराई भागातील सर्वे नंबर १ वरील आरक्षित जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी संबंधित आरक्षणे प्रारूप आराखड्यातून वगळण्यात यावीत यासाठी गेवराई नगर परिषद समोर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, बीड जिल्हा युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष कडुदास कांबळे, युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनातील मागण्या संदर्भात गेवराई नगर परिषद मुख्याधिकारी यांनी आंदोलनातील कार्यकर्ते आणि अतिक्रमण धारकांची त्यांच्या दालनात विस्तारित बैठक घेऊन सर्व मागण्या संदर्भात चर्चा करून लेखी पुढील कामाचा आराखडा सर्वांसमोर मांडण्यात आला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेमुळे आणि पुढील ठोस कार्यवाही मुळे समाधानी झाल्याने बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष सोनाजी कारके, विष्णू हातागळे, जिल्हा उपाध्यक्षा रितु भोसले, काँग्रेस सेवा दलाचे तालुका अध्यक्ष तुकाराम खरात, सय्यद मन्सूर, संगीता सुतार, निकाळजे ताई, छाया मराठे, शेषराव सदाफुले, लोखंडे बि के., युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण अजबकर, बळीराम गिराम, सुरेश पोपळघट, जिजा जगताप, प्रनव भारती, विशाल जंगले, प्रहार जनशक्ती पक्षाचे गेवराई तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ सुतार, रविंद्र पाटोळे, नंदकिशोर शेटे, निजामखाॅ पठाण, प्रभाकर भोसले सुधाकर छगनराव, अशोक हातागळे शिवाजी गायकवाड, लक्ष्मीनारायण पारी, शेख रहीम, शेख राजू रवी हिवाळे, सुरेश शिंदे, मेहता भोसले, नयना भोसले, नुरकास भोसले, बड्या भोसले आदी बहुसंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.