ग्रामपंचायत निवडणूका जाहिर गाव पुढाऱ्यांचे वार्ड दौरे सुरु

36

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.13डिसेंबर):-दि. ११राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि एकच खळबळ उडाली. झाले असे की डिसेंबर २०२० पर्यंत ज्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. त्या ठिकाणी सरकारने कोरोनामुळे प्रशासक नेमले होते पण अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि त्यातही तयारीसाठी वेळ खुपच कमी असल्याने गाव पुढार्याची चांगलीच पंचायत झाली आहे. यातून ही मार्ग काढत गाव पुढारी प्रत्येक वार्डात फिरताना दिसते आहेत. कोणत्या वार्डात कोणाचे किती मतदान आहे. त्यानुसार पुढारी आपापल्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत.

वेगवेगळी आश्वासने देत आहेत.लबाडाच अवताण जेवल्याशिवाय खरे नाही या म्हणीप्रमाणे हे पुढारी वागत असतात. त्यामुळे लोकांनी या पुढार्याकडें जास्त लक्ष न देता आपापल्या समस्यांकडे लक्ष द्यावे. कारण हे पुढारी इतर वेळेस आपल्याकडे जिंवत आहोत की मेलो हे पहायला सुध्दा येत नाहीत. आज त्याचा फायदा असल्याने ते प्रत्येक जेष्ठ व्यक्तीच्या पाया पडत आहेत. व आर्शीवाद मागत आहेत. अशी गावातील सुशिक्षित तरूणामध्ये चर्चा सुरु आहेत