संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांना एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेरंगेहात

31

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सगमनेर(दि.13डिसेंबर):- येथील शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यास एक हजार रुपयाची लाच घेताना आज बारा डिसेंबर शनिवार रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,यामुळे जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे, मागील महिन्यातच संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे राणा परदेशी या पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते व आज शनिवारी सायंकाळी याच संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांना 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये चर्चा व खळबळ निर्माण झाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील बापूसाहेब देशमुख (पोलिस नाईक) त्यांच्याकडे एक मिसिंग गुन्ह्याचा तपास होता, संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथील एक महिला काही दिवसांपूर्वी मिसिंग झाली होती व ती 11 डिसेंबर रोजी शुक्रवारी मिळून आली, त्यामुळे तिचे नातेवाईक आज बारा डिसेंबर शनिवार रोजी तिला संगमनेर शहर पोलिस ठाण्यात घेऊन आले व हा मिसिंग चा गुन्हाची फाईल बंद करण्याची विनंती केली ,मिसिंग चा गुन्हा ची फाईल बंद करण्यासाठी व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी ,जाबजबाब घेण्यासाठी तपासी अधिकारी पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांनी या कुटुंबाकडे एक हजाराची लाच मागितली होती व त्यासंबंधी या कुटुंबाने यापूर्वीच नाशिकचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती.

त्यानुसार सापळा रचून आज सायंकाळी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बापूसाहेब देशमुख ( पोलीस नाईक) यांना मिसिंग केस संदर्भात कागदपत्रे ची फाईल बंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संगमनेर शहर पोलिस स्टेशनला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना मागच्या महिन्यातच रंगेहात लाच घेताना पकडले होते व आता हा दुसरा छापा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकून बापूसाहेब देशमुख या पोलीस नाईकांना पकडले आहे, त्यामुळे संगमनेर शहरासह जिल्ह्यात पोलिस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे,