धुळे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपन्न

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी):-9075716526

धुळे(दि.13डिसेंबर):- मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांच्या आदेशानुसार दर रविवारी दुपारी चार वाजता बैठक आयोजित करण्यात येते. त्यानुसार आज पाचव्या रविवारी दुपारी चार वाजता मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निरोप मेसेज फोन सर्वांना करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी चार वाजता बैठक खेळीमेळीच्या वातावरणात व महत्त्वाच्या विषयांवर विचार विनिमय करून संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष दुष्यांत राजे देशमुख, जिल्हा सचिव संदीप जडे, जिल्हा सचिव अजित दादा राजपूत तसेच बंडू दादा देवरे, निलेश गुरव ,साहिल खान, मदन पाटील, हरीश जगताप, रोहित नेरकर , अमृत पाटील व प्रज्वल चव्हाण हे सर्व उपस्थित होते.