भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभ अभिवादनास प्रतिबंध नको योग्य उपाययोजना कराव्यात

35

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.14डिसेंबर):- भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यापासून अनुयायांना रोकू नये. ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा आंबेडकरी रोषाला सामोरे जाल असे मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यंक्त केले.

कोरोना सदृश्य स्तिथी पाहता देशासह सर्वत्र विविध उपाययोजना करण्यात आल्या व येत आहेत, सर्व प्रार्थना स्थळे सरकारने उघडी ठेविली असून सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचा सरकार विचार करत आहे, किंतु आंबेडकरी अनुयायांचे सर्व उत्सव व अभिवादन घरात बसून करा असे सांगत आहे या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करत असल्याचेही डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

14 एप्रिल 20 रोजी महामानव विश्वरत्न डॉ. आंबेडकर म्हणजेच भीम जयंती उत्सव, बुद्ध पौर्णिमा, अशोक विजयादशमी दसरा प्रामुख्याने बौद्धांचे प्रमुख उत्सव साजरे करण्यास सक्तीने बंदी आणली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनि अभिवादन करण्यास मज्जाव केला, अनुयायांनी शांत बसून घरातूनच उत्सव व अभिवादन केले, मात्र: आता सरकारने 1 जानेवारी 2021 ला भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यास रोखू नये.अशी इच्छा डॉ माकणीकर यांनी व्यक्त केली.

अभिवादन करण्यास एक नियमावली बनविण्यात येऊन जागोजागी सरकारने सॅनिटायजर चे फवारे उभारावेत, अभिवादन करण्यास रोखण्याऐवजी अनुयायांच्या अस्मितेचा प्रश्न जाणून भावणेचा सन्मान करावा व योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा सरकार वरील आंबेडकरी अनुयायांचा रोष लवकरच उद्रेक घेईल अशी भीती डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

आंबेडकरी जनता भोळी भाबडी असली तरी शिक्षित आहे, त्यांना प्रसंगावधान कळते, त्यामुळे सरकारने आंबेडकरी अनुयायांबाबत साशंकता बाळगू नये, त्यांना विनम्रपणे अभिवादन करू द्यावे पोलिस बळाचा व कायद्यांच्या कलमांचा वापर करून दबावतंत्राणे आंबेडकरी अनुयायांना वेठीस धरू नका योग्य त्या उपाययोजना करा अन्यथा आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरे जाल असा इशारा राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिला आहे.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महाराष्ट्र व पुणे जिल्हा कार्यक्रणीच्या उपस्तिथीत शेकडो डेमोक्रॅटिक रिपब्लिकन्स कार्यकर्ते अभिवादन करणार असून असेल हिम्मत तर कार्यकत्यांना रोखून दाखवावे असेही आवाहन डॉ. माकणीकर व कार्याध्यक्ष कॅ. श्रावण गायकवाड यांनी केले आहे.