गंगाखेड-परळी रोड वर भिषण अपघात चौघेजण जागीच ठार

49

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.14डिसेंबर):- गंगाखेड परळी रोडवर असलेल्या करम पाटी जवळ जिनिंग समोर झालेल्या हायवा व ऑटोच्या अपघातात ऑटोतील चौघे ठार झाल्याची घटना दि.13 डिसेंबर रोजी रात्री सहा सातच्या वाजता घडली. या अपघातात ठार झालेले चारही तरुण असून ते अंबाजोगाई येथील आहेतअपघात एवढा भीषण होता की ऑटो हायवा खाली फसल्याने ऑटोचा चुराडा झाला ऑटोतील मृतदेह रात्री साडे आठ वाजता बाहेर काढण्यात आले.

सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड परळी रस्त्याने परत परळी मार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या रियर ऑटो क्रमांक एम.एच.23 टी.आर. 311 ला परळीकडून राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवा क्रमांक एम.एच.22 ए. एन.5121 ने समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले(20), दत्ता भागवत सोळंके (25), आकाश चौधरी (23), ऑटो चालक मुकुंद मस्के (22) सर्व रा.अंबाजोगाई है चार तरुण जागीच ठार झाले आहेत.

अपघाताची माहिती समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीनिवास भिकाने, स.पो.उपनिरिक्षक देवराव मुंढे, पांडुरंग काळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा आणि , होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी गस्तीवर असलेले स.पो.उपनिरिक्षक दिलीप अवचार, आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

हायवा खाली सापडून चुराडा झालेला ऑटो व त्यात अडकलेल्या मयतांचे मृतदेह करम, निळा, वडगाव स्टेशन येथील ग्रामस्थ व अन्य लोकांच्या मदतीने रात्री 8:30 वाजता बाहेर काढून गंगाखेड येथील खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले. हायवा चालक फरार झाल्याने हायवा खाली सापडलेला ऑटो व त्यातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीसांना व ग्रामस्थांना अथक परिश्रम करावे लागले.