मकाई सह. साखर कारखान्याचा पहिला हप्ता २२००रु जमा

30

🔹जिल्ह्यात सर्वाधिक उचल देणारा कारखाना

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.14डिसेंबर):- मकाई सह. साखर कारखान्याने शेतकर्यांच्या ऊसाला प्रति टन २२००प्रमाणे पहिली उचल शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली आहे. कारखान्याचे चेरमन श्री. दिग्विजय बागल यांच्या अथक प्रयत्नानंतर मकाई सह साखर कारखाना या वर्षी चालू झाला. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पहिली उचल देणारा मकाई सह. साखर कारखाना ठरला आहे.

यावेळी श्री. दिग्विजय बागल म्हणाले की कारखाना चालू करताना असंख्य अडचणी आल्या पण या अडचणींवर मात करत कारखाना चालू केला, आणि शेतकर्यांनी ही विश्वास दाखवून ऊस कारखान्याला दिला. तो विश्वास सार्थ करत मा. श्री. दिग्विजय बागल यांनी प्रति टन २२००प्रमाणे उचल दिली. यात कारखान्याचे कार्यकारी संचालक खाटमोडे साहेब, सर्व कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे श्री. बागल म्हणाले.