कार्यतत्पर पाणीपुरवठा कर्मचारी रामसिंग गिरासे यांचा सत्कार

26

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.14डिसेंबर):- वरवाडे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी श्री रामसिंग गिरासे ह्यांचा सत्कार उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये , सभागृह नेते रणविरसिंह देशमुख भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रविण महाजन यांनी सांगितले की पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी कार्यतत्पर असुन कोरोनाकाळात देखील अहोरात्र काम करुन पाणीपुरवठा सुरळीत ठेवला त्याचप्रमाणे दाऊळ ते दोंडाईचा जुनी जलवाहिनीची दुरस्ती मा.आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.नगराध्यक्ष ताईसौ नयनकुवँर रावल यांच्या अध्यक्षतेखाली करुन दोंडाईचा शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला आहे सर्वच कर्मचारी कामसु व प्रामाणीक आहेत असाच अनुभव दोंडाईचा शहरातील नागरिकांना येत असतो.

पाणीपुरवठा विभागाचे वायरमन रामसिंग गिरासे हे दि.५ डिसेंबर रोजी आपली रोजची सेवा देऊन सायंकाळी आपल्या सुनेला घेण्यासाठी शिरपुर तालुक्यातील भामपुर येथे गेले होते परंतु रात्री दाऊळ व तावखेडा येथील पाणीपुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्पातील प्रत्येकी एक पंप अचानक बंद पडला मुळात वाँश आऊट ड्रेनेज लाइन ब्लाँकेजमुळे पाणीपुरवठा वितरण व्यवस्था खंडीत झाली होती तो ब्लाँकेज काढुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्नात असतांनाच दाऊळ व तावखेडा येथील प्रत्येकी एक पंप बंद पडले रात्री १० वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे प्रमुख दिनेश विंचु यांनी सभापती प्रविण महाजन यांना फोन करुन वस्तुस्थिती कळवली व सांगितले की आज रात्री पंप सुरु झाले नाही.

तर उद्याचा संपुर्ण पाणीपुरवठा होऊ शकणार नाही मुळात ड्रेनेज लाइन ब्लाँकेजमुळे पाणीपुरवठा एक दिवस उशीराने होत आहे यावर प्रविण महाजन व दिनेश विंचु यांनी रात्री अवेळी ११ वा.पाणीपुरवठा विभागाचे वायरमन श्री रामसिंग गिरासे यांना आपत्कालीन व्यवस्था विषयी विचारले श्री रामसिंग गिरासे यांनी सांगितले की मीच आता निघुन येतो कारण नविन व्यक्तीस मुळात बिघाड समजणार नाही व श्री रामसिंग गिरासे आपल्या सुनेला न आणता रात्री १२ वाजता भामपुरहुन मोटारसायकलने ५० किमी.प्रवास करुन पहाटे ३ वाजेपावेतो पंप सुरळीत करुन पुन्हा भामपुर येथे आपल्या सुनेला आणण्यासाठी गेले .

अशा कार्यतत्पर कर्मचारी श्री रामसिंग गिरासे यांचा सत्कार उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये ,सभागृह नेते रणविरसिंह देशमुख , भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन ,मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम इ मान्यवरांनी केला याप्रसंगी बांधकाम सभापती निखिल जाधव , आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे,शिक्षण सभापती राजेश जाधव , नगरसेवक कृष्णा नगराळे,भरतरी ठाकुर ,संजय तावडे ,नरेंद्र कोळी , चिरंजीव चौधरी , नरेंद्र गिरासे,सागर मराठे , किशन दोधेजा ,गिरीधारी रुपचंदानी ,खलील बागवान ,इरफान पिंजारी ,सौ मनिषा जाधव, नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक युसुफ कादीयानी इ मान्यवर उपस्थित होते.तसेच पाणीपुरवठा विभागाचे वितरण व्यवस्था प्रमुख दिनेश विंचु ,नंदु वाडीले ,संदीप लोणारे ,छोटु ओतारी,छोटु धनगर ,संजय धनगर ,रघुनाथ पाटील इ कर्मचारी उपस्थित होते.