“दिशा किंवा शक्ति” कायद्या अंतर्गत दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी – रोहित अहिवळे

29

🔺बिलोली येथील मुखबधीर युवती बलात्कार व हत्या प्रकरण

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

सातारा(दि.14डिसेंबर):- नांदेड जिल्यातील दि.९ डिसेंबर२०२० रोजी बिलोली तालुका झोपडपट्टीतिल सुनीता कुडके या २७ वर्षीय अनाथ मूकबधिर मुलीवर तिच्या असहायतेचा फायदा घेत केलेला बलात्कार, अत्याचार व खून प्रकरणी दलित पँथर संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात येत आहे.
हा अत्याचार आणि दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधर्माला व त्याच्या साथीदारांना व इतर त्यांना मदत करणाऱ्याची सखोल चौकशी व्हावी तसेच या आरोपींना महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन “दिशा किंवा शक्ति” कायद्या अंतर्गत १० दिवसाच्या आत हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दलित पँथर च्या वतीने करीत आहोत.

महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, त्या मधील कुठल्याही स्तरातील, कुठल्याही समाजातील कुठल्याही जाती-धर्मातील मुलीमहिला सुटलेल्या नाहीत, त्या सर्व घटनांबद्दल दलित पँथर सातारा जिल्हा तीव्र व जाहीर शब्दात निषेध करत आहे. अशा घटना घडवणाऱ्या विकृतीना जरब बसवण्यासाठी किंवा नायनाट करण्यासाठी वरील घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी.

या घटनेने सर्व महाराष्ट्रारातील स्त्रियांचा सन्मान करणाऱ्याच्या भावना दुखावल्या आहेत, त्याच बरोबर सदर महिला दलित समाजातील असल्याने सर्व बहुजन समाजात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.तरी आपणांस पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की या मूकबधिर मुलीच्या हत्ये प्रकरणातील अटक आरोपी तसेच चौकशीत उघड होणाऱ्या इतर आरोपीना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अन्यथा दलित पँथर संघटना महाराष्ट्र राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा रोहित अहिवळे सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी दिला आहे.

निवेदन देते वेळी लक्ष्मण वि.काकडे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, विराज भोसले सातारा जिल्हा संपर्क प्रमुख, मंगेश आवळे फलटण तालुका अध्यक्ष, आकाश भा.काकडे फलटण शहर अध्यक्ष, फिरोजभाई मुलाणी फलटण तालुका उपाध्यक्ष, बापुराव सावंत फलटण शहर उपाध्यक्ष, देविदास दा.जगताप,फलटण तालुका सरचिटणीस, गणेश अहिवळे फलटण तालुका सचिव, रोहित य.अहिवळे, फलटण तालुका कार्याध्यक्ष, ओमकार अहिवळे फलटण तालुका प्रसिद्धी प्रमुख, दत्ता दि.खलाटे फलटण तालुका संघटक, राम व.पवार फलटण शहर उपाध्यक्ष, राकेश पवार, फलटण शहर सरचिटणीस किरण अहिवळे, फलटण शहर कार्याध्यक्ष, रोहित अडागळे फलटण शहर संघटक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.