पीओपी बंदी विरोधात कुंभार बांधवांची एकजुट करून मोर्चाचा निर्धार

31

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.16डिसेंबर):-केंद्रसरकारने जानेवारी 2020 पासून लागू केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी विरोधात जिल्ह्यातील कुंभार समाज एकवटला आहे. पीओपी विरोधात जनजागृतीसा ठी कुंभार समाज कृती समितीचा मेळावा सडोली खालसा येथे झाला. कुंभार समाजावरील अन्याय रोखण्यासाठी व शासनाने पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी डिसेंबर मध्ये हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा निर्धार कुंभार बांधवांनी केला.

करवीर तालुक्यातील कुंभार बांधवांचा हा मेळावा सडोली खालसा येथे झाला. शासन झोपेचे सोंग घेत आहे .त्यामुळे कुंभार समाजाची व्यथा मांडून शासनाला जागे करण्याची वेळ आली आहे. कुंभार समाजाचा विकास हा कुंभार बांधवांच्या एकसंघपणावर अवलंबून आहे.पीओपी बंदी उठवण्यास सह इतर हक्कांच्या मागण्यांसाठी शासनाचे दार ठोठावण्याची गरज असल्याचे कुंभार समाजाचे अध्यक्ष माजी महापौर मारुतीराव कातवरे यांनी सांगितले .पीओपी हा मातीचा प्रकार असून यातून प्रदूषण होत नसल्याचा अहवाल संशोधन बोर्डाने केला आहे असा अध्यादेश ही 2015 /16 मध्ये झाला आहे.

घटनेत बदल केल्याशिवाय पीओपी वर बंदी घालणे शासनाला अशक्य आहे. त्यामुळे डिसेंबर मध्ये शासनाला धडकी भरवणाऱ्या मोर्चात आपल्या भवितव्यासाठी सर्व कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन प्राध्यापक प्रकाश कुंभार यांनी केले.
उपस्थित शिवाजी कुंभार (कुडित्रे) पंढरीनाथ कुंभार( म्हालसवड़े) यांनी आपले मनोगते व्यक्त केली .प्रत्येकाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कुंभार समाज काम करत राहील. त्याआधी न्याय व हक्कासाठी कुंभार बांधवांनी एकवटले पाहिजे.

डिसेंबर मधील आक्रोश मोर्चा रस्त्यावर उतरून मागण्या शासन दरबारी मांडून असे आवाहन जिल्हा युवा अध्यक्ष उत्तम कुंभार यांनी केले.सदर मेळाव्यास सतीश बाचणकर, संभाजी माजगावकर, शिवाजी वडणगेकर ,बबन वडणगेकर, नामदेव कुंभार ,कृष्णात कुंभार (खुपिरे)सदाशिव कुंभार (कुडित्रे), डॉ. रामचंद्र कुंभार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत नायकु कुंभार व धोंडीराम कुंभार यानी तर प्रास्ताविक प्रा. निवास कुंभार यांनी केले तर आभार श्री राजाराम कुंभार (म्हारूळ) यांनी मांडले.या मेळाव्यासाठी कुंभार समाज सडोली खा संयोजन केले. नंदगाव ,बाचणी ,हिरवडे, हसुर, शिरोली ,बीड, खुपिरे,सांगवड़े ,कांडगाव ,वाशी,सडोली दु, कुडित्रे व इतर गावातील कुंभार बांधव उपस्थित होते.