चौसाळा येथे भव्य खुल्या जिल्हास्तरीय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उत्साहात संपन्न

31

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

माजलगाव(दि.16डिसेंबर):-भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील चौसाळा येथे भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने भव्य खुल्या जिल्हास्तरीय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या भव्य खुल्या टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे कर्तव्यदक्ष जिल्हाअध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील , चौसाळ्याचे सरपंच मधुकर तोडकर ,भाजपा युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस शरद झोडगे,वंचितचे जिल्हामहासचिव सचिन मेघडबंर,पत्रकार अमजद पठाण,स्पर्धेचे आयोजक तथा वंचितचे बीड तालुका संघटक विवेक कुचेकर,प्रा,राजेद्रं कोरडे ,किरण वाघमारे,जेष्ठ नेते भीमराव पायाळ,अनिकेत डोळसे,यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथमता सर्व मान्यवरांच्या हस्ते विश्ववंदणीय छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक एकता क्रिकेट कल्बचे विशाल सोनवणे,अन्वर शेख,संजय बांगर,दिपक हामणे,मिलींद सोनवणे,सर्फराज शेख,वैभव सोनवणे यांच्यासह जिल्हयातील अनेक क्रिकेट टीम व क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थीत होते.