राष्ट्रवादीचे खासदा व अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे चित्रीकरणासाठी भंडाऱ दर्यात

27

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

भंडारदरा(दि.16डिसेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान सदस्य तथा खासदार सन्माननीय डॉ. अमोलजी कोल्हे हे जिजाऊ माता व संभाजी महाराज यांच्यावरील मालिकेच्या चित्रीकरणासाठी शेंडी भंडारदरा परिसरात आले असता राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, युवा नेते अमित भांगरे, सरपंच दिलीप भांगरे यांनी भेट घेऊन स्वागत केले.

यावेळी अशोकराव भांगरे यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या सोबत पर्यटन विकास संदर्भात चर्चा केली त्यावेळी परिसरातील पर्यटन विकास, गडकिल्ले संवर्धन यासाठी केंद्र सरकार कडून हवी ती मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करु व पुणे व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या गडकिल्ले यांच्या माध्यमातून गिर्यारोहक पर्यटकांना भ्रमंती करत भंडारदरा येथे पावसाळ्यात पहेलगाम पाहण्यासाठी यावे.

असी साद घातली व तुम्ही मला दिल्ली येथे भेटा आपण पर्यटन विकास संदर्भात प्रश्न मार्गी लावुन पर्यटन ाच्या माध्यमातून परिसराचा चेहरा मोहरा बदलुन टाकत कायापालट करु असे आश्वासन दिले तर स्व.यशवंतराव भांगरे साहेबांचा सामाजिक कार्याचा वारसा ह्या पिढीने जपला असून समर्थपणे लोकसेवा करीत आहेत असे गौरवोद्गार अमोल कोल्हे यांनी भांगरे परिवराबद्दल काढले…परिसर बघून समाधान वाटल्याचे कोल्हे यांनी सांगितले..!