स्थलांतरितांचा सन्मान व्हावया !

29

[आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिन ]

जागतिक पातळीवरील ‘सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मुव्ह’ या संकल्पनेखाली दि.१८ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने करार स्वीकारला. त्यानंतर इ.स.२०००मध्ये जसे आवाहन केले गेले तसे १८ डिसेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. स्थलांतरित व्यक्ती कोणास म्हटले जाते? याची संकल्पना अशी – जी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करू लागते, जी विशेषतः उपजीविकेसाठी आवश्यक अशा काम-धंद्याच्या शोधात आलेली असते किंवा राहणीमानाच्या चांगल्या सुधारित सुविधायुक्त परिस्थितीसाठी स्थानात बदल करून राहू लागलेली आहे. अशीलाच स्थलांतरित व्यक्ती म्हटले जाते.
जागतिक परिस्थिती पाहू जाता आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची एकूण लोकसंख्या सन २००० सालच्या १७५ दशलक्षांवरून सन २०१५ साली २४४ दशलक्ष इतकी झाली.

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्तींपैकी जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्येत ७६ दशलक्ष लोकसंख्या ही युरोपात किंवा ७५ दशलक्ष लोकसंख्या ही आशियामध्ये वास्तव्यास आहे. मात्र स्थलांतरितांसाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्थेकडून या लोकांच्या आणि त्यांच्या समुदायांचे कौतुक केले जाते. याकरिता विश्वभरातील मानवास प्रोत्साहन व तशा संधीही निर्माण करून दिल्या जात आहेत, हे येथे उल्लेखनीयच ! जागतिक पार्श्वभूमीवर दरवर्षी १८ डिसेंबरला संपूर्ण जगात ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस (International Migrants Day)’ साजरा केला जातो. दि.१८ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने स्थलांतरित श्रमिकांच्या अधिकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणार्थ आंतरराष्ट्रीय कराराला अंगिकारले होते. या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी दि.४ डिसेंबर २००० रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने जगात स्थलांतरित व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या अधिकारांविषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतूने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस साजरा केला जावा, असे आवाहन करण्यात आले होते.

हा दिवस साजरा करण्यामागील ध्येय-धोरणे असे की प्रत्येक प्रवाशास वा स्थलांतरित व्यक्तीस तेथील शासनाने व नागरिकांनी सन्मानाने वागवावे. त्यांच्या स्थलांतर पश्चात्ताप त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या, आव्हाने व अडचणींविषयी जागरूकता वाढविली जावी. आदी निश्चित केलेली आहेत. दि.१९ सप्टेंबर २०१६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने निर्वासित आणि स्थलांतरित लोकांसंबंधित प्रथम शिखर परिषदेत निर्वासित आणि स्थलांतरितांचे संरक्षण वाढवण्याचा विचार करण्यात आला. त्याच वेळी निश्चित केलेल्या प्रतिबद्धतेच्या संचाचा स्वीकार केला. हे दस्तऐवज ‘निर्वासित आणि स्थलांतरित व्यक्तींसाठी न्यूयॉर्क घोषणापत्र’ म्हणूनही ओळखल्या जाते. पाकिस्तानसारखे काही परप्रांतीय सरकार व जनता तर आजही अशा स्थलांतरितांना सन्मानाची वागणूक देताना आढळत नाही.

धर्मपरिवर्तनासारखे शस्त्र उगारतांना दिसून येतात, ही फार खेदाची बाब आहे. आपला भारत सर्वधर्म सहिष्णुता पाळणारा देश आहे. त्यामुळे येथे कोणीही यावे व दादागिरी दाखवावी, असेच चालू आहे. विशेषतः ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांची संख्या अधिक झपाट्याने वाढतांना दिसून येत आहे. तर येथील मुलनिवासी मात्र उदरभरणाच्या जटिल समस्येपोटी रोजगाराच्या उद्देशाने परप्रांतीय कंपन्यांमध्ये काम करू लागला आहे. हा दिवस साजरा करणे व तद्नुरुप प्रवाशांना वागविणे आजच्या धकाधकीच्या जीवनात फार निकडीचे झाले आहे. माणसाने माणुसकी म्हणून तरी या गोष्टीचा स्वीकार केलाच पाहिजे, असे वाटते.

!! विश्व प्रवासी दिन चिरायू होवो !!

✒️लेेखक:-श्रीकृष्णदास निरंकारी.
[ प्रसिद्ध मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश ]
मु – वं.रा.संत तुकडोजी महाराज चौक,
रामनगर, गडचिरोली, ता.जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
email – krishnadas.nirankari@gmail.com