दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, मालपूरच्या माजी सैनीकांने शौर्य पदक सरकारला केले परत

33

🔹माजी सैनीकाच्या निर्णयाला दिली,गावातील अनेक संघटनांनी साथ…

✒️संजय कोळी(दोोंोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.17डिसेंबर):- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ एक सुजान, जागृत शेतकरी या नात्याने निषेध म्हणून सन्मानाने मिळालेले सर्व मेडल व पारितोषिक मालपूर तालुका शिदंखेडा येथील माजी सैनिक युसूफ उस्मान खाटीक यांनी दोंडाईचा अप्पर तहसीलदार श्री सुदाम महाजन यांचाकडे देऊन केंद्र सरकारला परत केले आहे. जिल्ह्यात प्रथमच माजी सैनीकाकडून पारितोषिक परत करण्याची वेळ आल्याने,सरकार आतातरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखणार की नाही, अशी बोचक प्रतिक्रिया सरकार बाबत जनसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

यावेळी माजी सैनिक यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा म्हणून सोबतमहाराष्ट्र राज्य ग्रंथपाल संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बापुसाहेब रविंद्र देशमुख,एकलव्य संघटनेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष गुलाब दादा सोनवणे,रिपब्लिकन पार्टीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ काका माणिक, ज्ञानोपासक मंडळीचे सचिव अमित दादा पाटील,अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष व माजी शिक्षण सभापती नाजीम भाई शेख , माजी सैनिक नाना भाऊ पाटील, माजी सैनिक धनसिंग हिलाल गिरासे , प्रकाश संभाजी आहिरे, सामाजिक कार्यकर्ते, घनश्याम भाऊ राजपूत, विरेंद्र गोसावी, अँड प्रमोद मराठे, हाजी जावेद,प्रतिक देशमुख, जितेंद्र तिरमले, दिलीप माणिक, गुलाब पाटील, प्रकाश आहिरे, रईस बागवान,आबीद शेख,व्ही.जी.पाटील,दिलीप माणिक, भालचंद्र पाटील, दगडू सोनवणे, शिवाजी पाटील, वीरेंद्र गोसावी, न्हानजी आहिरे, प्रताप भवरे,हाजी जावेद,शकील भांड,इमरान शहा व अन्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक खाटीक यांनी निवेदन देतांना सांगितले की, मी सेवानिवृत्त सैनिक असुन उदरनिर्वाहसाठी मालपूर येथे शेती व्यवसाय करत आहे. सैनात असतांना मी १४ डिसेंबर १९७१ रोजी भारत पाकिस्तान युद्धात भारताला अभुतपुर्व यश मिळवुन दिले होते. ह्या युद्धात चांगले काम केल्यामुळे मला भुतपुर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पाच पदक व एक विदेश पदक तसेच एक संग्राम पदक मिळाले आहे, व आज रोजी मी हे सर्व पदक स्वखुशीने केन्द्र व राज्य सरकारच्या कुषी विषयक लादण्यात येणाऱ्या चुकीच्या कायदे विरोधात निषेध म्हणून एक सुजाण, जागृत किसान ह्या नात्याने निषेध म्हणून शासनाच्या प्रतिनिधीकडे परत करत आहे, असेही शेवटी सांगितले