गंगाखेड व्यापरी संकुलान तील महिलेस मारहाणीचा ऑडिओ व्हायरल

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.17डिसेंबर):-शहरातील दिनांक 15 डिसेंबर च्या मध्यरात्री च्या दरम्यान वृद्ध व भिक्षुकी महिलेस मारहानि चा ऑडिओ व्हायरल झाला असून या वृद्ध महिलेस मध्यरात्री वेळेत कुणीतरी नराधम मारहाण करत असल्याची माहिती आवाजात निष्पन्न होत आहे. गंगाखेड शहरातील गजबजलेला परिसर अहील्याबाई होळकर चौकातील मार्केट कमिटीचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलनच्या तळमजल्या खाली या महिलेस मारहाण होत असताना.

गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी या परिसरात एक देखील राऊंड झाला नाही का? वृद्ध महिलेस मारहाण होत असताना तिचा तो रडलेला आवाज तिची भाषा जरी समजत नसले तरी या भावना मला वाचवा मला अशाच अशु शकातात ?त्या नराधमाने या महिलेस कोणत्या उद्देशाने मारहाण केल.

अद्याप कळले नाही ,ही महिला जिवंत आहे का मरण पावली हे देखील माहित नाही, हा नरबळी असू शकतो का अशी चर्चा जनते होताना दिसते असे अनेक प्रश्न सध्यातरी चर्चेचा विषय बनले आहे. पण या सर्व प्रश्नांचा उलगडा तेव्हाच होणार जेव्हा ही महिला कोणाचा तरी निदर्शनास येईल.