विद्यार्थ्यांचे बसेस मुळे होणारे नुकसान

30

🔸युवा मित्र मंडळाने दिले आगर प्रमुखांना निवेदन

✒️हर्षल बिजवे(वरूड प्रतिनिधी)मो:-9503683249

वरुड(दि.18डिसेंबर):- बरेच दिवसापासून शाळा कॉलेजेस सुरू झाले आहे.परंतु राज्य परिवहन महामंडळच्या बसेस सुरू झालेल्या नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना वरुड येथील कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही.आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याकारणाने त्यांना जास्त आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे.

अशा अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे.ही गोष्ट आम्हाला कळताच बस व्यवस्थापक वानखडे सर यांना लवकरात लवकर सकाळची बस सुरू करण्याबाबत चर्चा केली व त्यांना निवेदन देण्यात आले.

वानखडे साहेबांनी क्षणाचा ही विलंब न करता येत्या दोन-तीन दिवसात बस सुरळीत सुरू करण्याचे आश्वासित केले.
यावेळी युवा मित्र मंडळ पुसला अध्यक्ष सुरज धर्मे, सोशल मीडिया महामित्र संदीप बागडे, प्रद्युम्न तवले, जावेद शेख आदी उपस्थित होते.