भिसी येथे कृषी उत्सव संपन्न

36

✒️भिसी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भिसी(दि.18डिसेंबर):-येथील धनराज मुंगले पेट्रोल पंपावर आज दिनांक 18 डिसेंबर ला कृषी उत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाचे व भारत पेट्रोलियम चे जाणकार मार्गदर्शक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भिसीचे प्रबंधक यांची उपस्थिती होती.
भारत पेट्रोलियम च्या सौजन्याने भिसी पेट्रोल पंपाचे संचालक धनराज मुंगले यांचे पेट्रोल पंप आवारात आज शुक्रवार दिनांक 18 डिसेंबरला दुपारी बारा वाजता घेण्यात आलेल्या कृषी उत्सव या कार्यक्रमाला भारत पेट्रोलियम चे सेल्स ऑफिसर हिमांशू यादव, फिल्ट सेल्स विभागीय मॅनेजर मनोज भगत, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधक अनुपकुमार, कृषी क्षेत्राचे कृषी सहाय्यक ताकसांडे मैडम , संदीप कांबळे, पेट्रोल पंप संचालक तथा राजकिय व सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ मुंगले , डॉ राजेश मुंगले प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पाणी पंप इंजन अथवा अन्य वाहने यामध्ये वापरण्यात येणारे डिझेल पेट्रोल व अन्य तेल वापरताना वाजवी दरात भारत पेट्रोलियम चे उत्पादन कसे लाभदायक आहेत.

याबद्दल भारत पेट्रोलियम चे हिमांशू यादव व मनोज भगत यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले तर कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना व शेती पूरक उद्योग याबाबत कृषी सहाय्यक संदीप कांबळे तसेच कृषी सहाय्यक पी.एम. ताकसांडे मैडम यांनी मार्गदर्शन केले तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भिसीचे प्रबंधक अनुपकुमार यांनी शेतकऱ्यांना बँकेमार्फत मिळणाऱ्या सोयी सवलतीच्या लाभा बद्दल माहिती दिले कार्यक्रमाला भिसी व परिसरातील शेतकरी बांधव तसेच भारत पेट्रोलीयमचे ग्राहक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज भाऊ मुंगले संचालन सारंग भिमटे तर आभार हरीश कामडी यांनी पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता धीरज मुंगले , अतुल पडोळे, श्याम ठोंबरे, निखिल अवचट, शुभम गोहने, संदीप पोहनकर, विशाल गोहने, शुभम नागदेवते, प्रफुल्ल चिडे, सचिन मुंगले, सेवक रामटेके, दिलीप टापरे, गोविंदा चौधरी, सुमित सुपारे, प्रणय मुंगले, नरेंद्र नगराळे आदींनी सहकार्य केले.