अखेर कुंडलवाडीचे भुमिपूत्र तहसिलदारांनी ग्रामिण रुग्‍णालाय करिता जागा शेाधली

90

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.19डिसेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील मंजूर झालेल्‍या ग्रामिण रुग्‍णालय बंद पडलेल्‍या जिल्‍हा परिषद शाळेच्‍या ठिकाणी मंजूर झाले होते परंतू हि जागा जिल्‍हा परिषेदेकडून राज्‍य शासनाने हस्‍तातंर केली होती परंतू हि जागा मंदिराची इनामी जमिण असल्‍याचे नोंद व या जागेसंदर्भात तक्रारीही करण्‍यात आल्‍याने भूमीपुजनाचे काम प्रशासनाचे काम थांबवण्‍यात आले होते.

यामुळे बिलोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार शरदचंद्र वाघमारे यांनी जागेची पाहाणी करुन हि जागा प्रस्‍तावित केल्‍याचे सांगितले.ग्रामिण रुगणालयाच्‍या जागेवरुन राजकारण घुसल्‍याने ग्रामिण रुगणालय होईल की किंवा निधी परत जाईल असा कयास नागरिकांत बांधल्‍या जात असताना कुंडलवाडीचे,भुमिपूत्र बिलोलीचे तहसिलदार कैलासचंद्र विठ्ठलराव वाघमारे यांनी आपल्‍या गावचे रुग्णालय जागेअभावी कामाचे भूमीपुजन रखडल्‍याने कुठे महाराष्‍ट्र शासनाची जाग आहे काय याचा शोध घेऊन गट क्रमांक ३१ हे प्राथमिक आरोग्‍य केंद्रा समेारील जागा महाराष्‍ट्र शासनाच्‍या नावे ०१ हेक्‍टर ३४ आर जमिन शासनाच्‍या नावे असलेली जागा आखेर तहसिलदारांना शोधण्‍यास यश आले.

यावेळी नगरपरिषेदेचे मुख्‍याधिकारी गंगाधर पेंटे, नगरध्‍यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठठावार, नगरसेवक शेख मुखतार, शैलेश -याकावार, सुरेश कोंडावार, सचिन कोटलावार, शंकर गोनेलवार, सेवानिवृत मंडळाधिकारी गंगाधरराव खेळगे, भीम पोतनकर, ठेकेदार एकबाल व इजिनिअर जागेची पाहाणी करताना उपस्थित होते.ग्रामिण रुग्‍णालयाचा निधी अाता परत जाणार नाही हे काम तात्‍काळ शासनाच्‍या जागेवर ग्रामिण रुग्णालय उभारणार असल्‍याने रुग्‍णालयाचे काम होणार असल्‍याने नागरिकांसाठी आशा पल्‍लवीत झाल्‍या असुन नव्‍याने रुजू झालेल्‍या कुंडलवाडीचे भुमीपूत्र तहसिलदाराकडून शहरवाशीयांना नवीन वर्षात अप्रत्‍यक्षरित्‍या एक भेट म्‍हटले तरी वावगे ठरणार असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.