संत गाडगेबाबा पुण्यतिथी पर्वावर वना नदी च्या पात्राची स्वच्छता

34

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.20डिसेंबर):- संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत हिंगणघाट शहराची जीवन दायिनी असलेल्या वना नदी च्या पात्राची स्वच्छता नगर परिषद हिंगणघाट व वना नदी संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार न.प.अध्यक्ष श्री. प्रेम बसंतांनी व मुख्याधिकारी श्री. अनिल जगताप यांचे द्वारा अर्पण करून करण्यात आली,त्यानंतर माझी वसुंधरा या मोहिमे अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी याना वसुंधरा शपथ देण्यात आली व या मोहिमे बद्दल माहिती देण्यात आली.

या नंतर सर्व उपस्थित न.प.अधिकारी व कर्मचारी व वना नदी संवर्धन यांचे सदस्य द्वारा संपूर्ण नदी पात्र व परिसराची स्वछता करण्यात आली..माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2021 या मोहिमे अंतर्गत या नंतर सुद्धा अश्या प्रकारचे अभियान नीयमित पणे राबविण्यात येईल असे नगर अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सांगितले, अभियान यशस्वी होण्याकरिता नगर परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले..