डाँ .बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण अभिवादनपर काव्यस्पर्धेचा निकाल जाहिर

28

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.20दिसे संभाजी ब्रिगेड -एक वादळ या संभाजी ब्रिग्रेडच्या गृपकडून डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कवि .विशाल इंगोले (अजातशत्रु )यांच्या संकल्पनेतुन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्याचा निकाल जाहिर करण्यात आला .हे आयोजन राहुल गजभिये ,ओजस केदार ,कवि .अमित मंदा अनिल ,कवयित्रि प्रिती पांडे ,कवी .योग काळे ,अँड.तेजश्री नलवाडे यांनी केले .या आँनलाईन काव्यस्पर्धेत @ डाँ .बाबासाहेब आंबेडकर / भिमा तु पुन्हा येशील का ? हे विषय देण्यात आले.

यामध्ये संपुर्ण देशातील कवि -कवयित्रीं सहभागी झालेत .त्यांनी सहभागी होऊन आपल्या रचना पाठविल्या.ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली .व स्पर्धकांची संख्या वाढल्यामुळे ही स्पर्धा २ गटात करण्यात आली .कविकवयित्रींनी पाठवलेल्या रचनांचे परिक्षण कवि .प्रा.आशुतोष निकम (अहमदनगर )यांनी केले .या अभिवादनपर स्पर्धेत डाँ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनातील सर्वच पैलुंवर कवी कवयित्रिंनी प्रकाश टाकला.

त्यामध्ये समुह १मध्ये गझलकार आनंद देवघडे (यवतमाळ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला .व्दितिय क्रमांक डाँ .विनोद उबाळकर ,तृतिय क्रमांक विभागून जगदीश्वर मुनघाटे ,आस्मिता सावंत व उत्तेजनार्थ आडबलवाड पांडुरंग सरमरकर,पुष्पांजली आप्पाजी कुंभार ,सौ.साधना कपाळ ,नंदिनी वानखडे,नीता पवार यांचा आला.

तसेच समुह २ मध्ये प्रथम क्रमांक अमरावती विद्यापीठाच्या प्राध्यापिका कवयित्री निर्मल काळबांडे ,द्वितीय क्रमांक किशोरी शंकर पाटील ,तृतीय क्रमांक विभागून संजय रुस्तम घोगरे ,कावेरी आप्पासाहेब गायके व उत्तेजणार्थ रश्मी मनीषा शशिकांत ,रजिया इस्माईल जमादार ,राजश्री पाटील ,सतिश तुळशीराम जाधव ,आनंद घायवट यांचा आला .अशी माहिती आयोजकांकडून कवि .विशाल इंगोले (अजातशत्रु )अमरावती यांनी दिली.