सिद्धनाथ मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला

34
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9975686100

म्हसवड(दि.20डिसेंबर):-15 डिसेंबर रोजी असलेला सिद्धनाथ माता जोगेशवरी रथोत्सव कोरोनाच्या कारणास्तव प्रशासनाकडून रद्द केला गेला.त्यामुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यातून येणाऱ्या भाविक भक्तांना यात्रा रद्द झालेने आपले कुलदैवत असलेले सिद्धनाथ माता जोगेशवरी यांचे दर्शन घेता आले नाही. रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करता आली नाही त्यामुळे भाविकांच्यात नाराजी होती.त्यावेळी प्रशासनाने यात्रा कालावधीत म्हसवड शहरात कलम 144 लागू केल्यामुळे सचारबंदी लागू होती त्यामुळे भक्तांना येता आले नाही.परंतु त्यानंतर आपल्या कुलस्वामीच्या दर्शनाला सिद्धनाथ मंदिरात गर्दी वाढू लागली.

लोक आपल्या कुटूंबासमवेत सिद्धनाथाच्या दर्शनाला येऊ लागले.आज सिद्धनाथ रथोत्सवानंतर येणारा सिद्धनाथाचा वार असणारा पहिला रविवार आज सिद्धनाथ मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.गावातील छोट्या व्यापाऱ्यानी आपली खेळणी,मेवा मिठाई,पेढा बर्फी आणि इतर दुकाने थाटली आहेत त्यामुळे येणाऱ्या भक्तांना नाथाचा प्रसाद घेऊन जाता येत आहे.
सिद्धनाथ रथाजवळ भाविक मोठ्या आनंदाने रथावर गुलाल खोबरे उधळताना आणि निशाण लावताना दिसत आहेत.असे म्हंटले जाते की ज्या भाविकांना म्हसवड सिद्धनाथ कुलदैवत आहे ते भाविक रथोत्सवांतर येणाऱ्या पंधरा दिवसात सिद्धनाथाच्या दर्शनाला येऊन जातात.आज जरी रथोत्सव झाला नसला आणि त्या दिवशी सिद्धनाचे दर्शन घेता आले नाही तरी आज मिळालेल्या दर्शनाने भाविक आनंदी दिसत आहेत.