नेर परिसरात कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.20डिसेंबर):- नेर परिसरात शेतकरी उन्हाळी कांदा लागवडीची तयारी करत आहेत. यामुळे यंदा या भागातील कांदा लागवड क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत.गेल्या वर्षभरापासून कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी कांदा उत्पादन घेण्यावर अधिक भर देत आहेत. धुळे तालुक्यातील नेर येथे व परिसरातील खंडलाय,देऊर,अकलाड-मोराणे,लोणखेडी या परिसरात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. दरवर्षी ७० टक्के उन्हाळी कांदा लागवड होते पाणी उपलब्धतेनुसार शेतकरी कांदा लागवड करतात. यंदाही शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत.

गेल्या वर्षात शेतकऱ्यांनी चाळी मध्ये कांदा साठा केल्यामुळे त्यांना जास्त फायदा झाला होता. यातून या वर्षीही कांदा चाळीत साठा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली आहे. चाळीत कांदा भरण्याआधी दहा ते पंधरा दिवस कांदा चाळीच्या बाहेर हवेशीर ठेवल्याने ओलावा नष्ट होऊन साठवणूक करणे योग्य तयार केलेले शेतकऱ्यांना कांद्याला जास्त दिवस टिकवता आले. चाळीमध्ये भरल्याने तीन महिन्यांनी कांदा चाळीमध्ये कांदा चाळणी केल्यास कांदा कमी खराब होतो.

शेतकऱ्यांनी सहा ते आठ महिन्यात पर्यंत कांद्याची साठवणूक केली होती. नेर येथे व परिसरातील कांदा हे पीक मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. शेतकरी वर्ग सदाशिव तानाजी खलाणे, राजेंद्र शिवराम कोळी, नानाजी झिपा अहिरे यांच्या शेता मध्ये कांदा लागवडीसाठी आलेले मजूर व शेतकरी वर्ग हे आपल्याला दिसून येत आहेत. *शेतकरी* *नानाजी झिपा अहिरे* : कांदा पीक घेण्याआधी त्या क्षेत्रात कांदा पीक घेतले असेल तर त्या क्षेत्रात कांदा पीक न घेता दुसरे पीक घ्यावे.

रब्बी हंगामात कापूस,मका, बाजरी म्हणून या पिकावर कांदा पीक चांगले उत्पादन देते. *शेतकरी* *राजेंद्र शिवराम कोळी* :नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठ परवडत नसल्याने ते गुजरातमधील अहमदाबाद व मध्यप्रदेशातील इंदूर येथे विक्रीसाठी घेऊन जात असतात. येथे चांगले भाव मिळत असल्याने नफा मिळतो आहे खरीप हंगामात हंगामात कांद्याला सुरुवातीला ८०० ते ५ हजार ५00 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता. यातून उन्हाळी कांद्याला ही चांगला दर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.