पोलीस मित्र परिवार महाराष्ट्र राज्य माण तालुका महिला आघाडी नियुक्त्या जाहीर

73

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.21डिसेंबर):-पोलिस मित्र परिवार महाराष्ट्र राज्य समन्वय समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा, डाँ, संघपाल उंबरे सर व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा, हाजी आस्लम सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी – ता- माण येथे समिती चे जिल्हा अध्यक्ष मा,सुभाष गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष मा, युवराज भोसले जिल्हा समन्वयक केंजले साहेब महिला समितीच्या जिल्हा उपाध्यक्षा मा.सौ चित्रा गायकवाड सरचिटणीस मा बी आर जगताप या जिल्हा कार्यकारिणी च्या उपस्थिती मध्ये माण तालुका महिला कार्यकारिणी निवडी बाबत बैठक होऊन तालुका अध्यक्ष पदी सौ त्रिवर्णा मदने सरचिटणीस साधना खरात,उपाध्यक्षा पदी सौ कुंभार मँडम यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.त्याचवेली खटाव तालुक्याच्या अध्यक्ष पदी मा. विश्वास जगताप यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले व पुढील कामकाजा संदर्भात योग्य त्या सुचना देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीचे प्रस्ताविक समिती चे तालुका अध्यक्ष मा. संतोष घाडगे यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मातालुका सरचिटणीस मा. मिलींद भोसले यांनी मानले. सदर बैठकीचे नियोजन मा. राजू आवटे यांनी उत्कृष्टपणे केले. सदर बैठकीसाठी विक्रम जगताप, किरण बनसोडे, संतोष भोसले, शरद शिंदे, किरण घाडगे, इ. मान्यवर उपस्थित होते.