कुंडलवाडीमध्ये भाजपाला पुन्हा एकदा सुरूंग

32

🔸भाजपाचे पदाधिकारी संजय राजाराम भास्कर यांचा कॉग्रेसमध्यो प्रवेश

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.22डिसेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी नगरपालीकेवर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला सुरूंग लागला असुन कुंडलवाडी नगरपलिकेच्या नगरसेविकेचे पती व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते संजय राजाराम भास्कर यांनी कॉग्रेस पक्षाचे विधान परिषेदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या उपस्थितीमध्य़े कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यामुळे महविकास आघाडीचे नगरपालिकेचे संख्याबळ १२ वर पोहचले असुन उपनागराध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमुलवार यांच्यावर अविश्वास येणार काय अशी चर्चा कुंडलवाडी व परीसरात सुरू आहे.भाजपचे सक्रिय कार्यकर्ते संजय भास्कर यांनी डॉ. विठ्ठल कुडमुलवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळुन कॉग्रेसमध्ये दि.२१ डिसेंबर रोजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.

यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,कुंडलवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार,नगरसेविका प्रतिनिधी तथा सेवानिवृत्त मंडळाधिकारी गंगाधरराव खेळगे,नगरसेवक शेख मुखतार खाजामियाँ,शंकर गोनेलवार,सुरेश कोंडावार,शैलेश -याकावार,सचिन कोटलावार,नगरसेविका प्रतिनिधी पोशट्टी पडकुटलावार,मा.नगरसेवक सयाराम नामतेश,भिम पोतनकर,हर्ष कुंडलवाडीकर,संदीप खेळगे यांची उपस्थिती होती.