ग्राम पंचायत निवडणूक : जमावबंदी आदेश लागू

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.23डिसेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील 629 ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला असून त्यासंदर्भात 11 डिसेंबर 2020 पासून आदर्श आचारसंहितेची अंमलात आली आहे. निवडणूकीत अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व गैरप्रकार होऊ नये म्हणून ग्राम पंचायत निवडणूकीचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसर व त्यांच्या संरक्षक भिंतीपासून 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मतमोजणीपर्यंत एकत्रित जमण्यास फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढले आहे.