मत्स व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधी’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

27

🔹कौशल्य विकास विभागाद्वारे 28 डिसेंबरला आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.23डिसेंबर):- जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता ‘मत्स व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधी’ या विषयावर मत्स व्यवसाय विकास अधिकारी जयेश बळकटे हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

सदर वेबीनार कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे संयुक्तरित्या दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुकांना meet.google.com/tni-jkzm-kpq या गुगल मीट लींकवर जॉईन होऊन कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्रमांक 07172-252295, 270933 यावर संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी कळविले आहे.