रयत शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका प्रमुख ढवळे ज्ञानेश्वर विठ्ठलराव यांची निवड

73

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.24डिसेंबर):-अँड रविप्रकाश उर्फ बापुसाहेब देशमुख रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व औरंगाबाद जिल्हा प्रमुख तय्यब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटिल यांच्या नेतृत्वाखाली रयत शेतकरी संघटनेचे शिरूर तालुक्याची जबाबदारी ढवळे ज्ञानेश्वर विठ्ठलराव यांना दिली आहे. आपण पुढील काळात शेतकरी, कष्टकरी वर्ग यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरू ठेऊन तळागाळातील सर्व सामान्य जनतेसाठी संघटनेच्या माध्यमातून काम करत राहावे. आपण पदावर काम करत असताना निपक्षपणे शेतकरी बांधवांसाठी काम करत राहावे.

जेणेकरून संघटनेला गालबोट लागेल असे कुठलेही काम न करता सामान्य माणसाच्या मदतीसाठी काम करत राहावे.. देशमुख साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि रयत शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी व गोरगरीब जनतेसाठी सर्व सामान्य माणसाच्या अडचणी दूर करण्यासाठी जिवाचे राण करून शेवटच्या क्षणापर्यंत पोहचवण्याचे काम करत राहिल अशी अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली मी कायम शेतकरी बांधवाच्या मदतीला तत्पर सोबत घेऊन योग्य ती दिशेने वाटचाल सुरू करित राहिल असे देखील ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे