नादुरूस्त विद्युत रोहित्रांची जागेवरच दुरुस्ती

36

🔸कुंडलवाडी महावितरणच्या कामाचे शेतकऱ्यांकडून कौतुक

✒️अशोक हाके(बिलोली,तालका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.25डिसेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील मनुर व पाटोदा(थडी) भागात लघुदाब वाहिनीच्या रोहित्र नादुरूस्त झाले होते.त्यामुळे शेतीपंपचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.त्यामुळे शेतातील पिके वाळून जात होती.याबाबत शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम पाठवुन रोहित्राची जागेवरच दुरुस्ती करून दिली.

सध्या रब्बी हंगाम चालू आहे.शेतातील हरभरा, गहू,भुईमूग या पिकांना पाणी देणे चालू आहे.पण परिसरातील मनुर व पाटोदा(थडी ) येथील रोहित्र नादुरूस्त झाल्याने पिकांना देण्यात येणारा पाणी पुरवठा बंद होता.शेतकऱ्यांनी ही माहिती कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांना सांगताच त्यांनी रोहित्र दुरूस्तीसाठी देगलूर ला घेऊन जावे लागते.व यासाठी महिनाभराचा कालावधी लागू शकतो.

त्यामुळे शेतक-यांच्या शेतातील पिके वाळून जाऊन नुकसान होऊ शकते.ही बाब लक्षात घेता जागेवरच रोहित्र दुरूस्ती होऊ शकते का ? यासाठी धर्माबादचे उपविभागीय अभियंता सुमीतकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नादुरूस्त रोहित्र दुरूस्तीसाठी येथील वीज वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची टीम पाठवली.टीममधील कर्मचाऱ्यांनीही नादुरूस्त रोहित्र जागेवरच खोलुन त्याची जागेवरच दुरुस्ती करून चालू केले.

त्यामुळे शेती पिकांना विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने पिकांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु झाला.त्यामुळे वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या कामाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.रोहित्र दुरूस्ती करण्यासाठीप्रधान तंत्रज्ञ व्हि.एन.गुडले,वरिष्ठ तंत्रञ साईनाथ लोलेवार,अनिल उशलवार,लक्ष्मण श्रीरामे,बालाजी तळणे,बाह्य तंत्रज्ञ मलेश मोतकेवार,निलेश संगेवार,गोंविद गवळे,योगेश शेरीयाल,रवी कोरेवार,संदीप सुरकुटलावार आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.