चंद्रपूर जिल्ह्यात (दि.26डिसेंबर) रोजी 24 तासात 84 कोरोनामुक्त 64 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.26डिसेंबर):- जिल्ह्यात मागील 24 तासात 84 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 64 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 135 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 192 झाली आहे. सध्या 584 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 68 हजार 556 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 44 हजार 131 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये सोमनाथपुर ता. राजुरा येथील 72 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 359 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 332, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 64 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 34, चंद्रपूर तालुका तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, सिंदेवाही पाच, मूल दोन, गोंडपीपरी एक, राजुरा एक, चिमुर एक व वरोरा नऊ, कोरपना चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.