आंबेडकर घराण्याच्या कुठल्याही सदस्यांची बदनामी सहन केली जाणार नाही – रिपाई डेमोक्रॅटिक

27

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.27डिसेंबर):- देशातील कोणत्याही महामानव व त्यांच्या घराण्याच्या कोणत्याही वंशजाबद्दल अपशब्द सहन केले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.

व्यक्ती स्वातंत्र्ये आहे म्हणजे लायकी नसतानाही कोणत्याही व्यक्तिमतवाबद्दल काहीही बोललेले ऐकून घेतले जाणार नाही.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारत भाग्य विधाते असून त्यांचे वंशज ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांचे बद्दल कवडीमोलाच्या दुर्बुद्धी महिलेने एकेरी बोलून खालच्या पातळीवर सोसियल मीडियावर वक्तवे लिहिले आहे. या वृत्ती प्रवृत्तीचा आरपीआय डेमोक्रॅटिक पार्टी जाहीर निषेध व्यक्त करत असून यापुढे कुणीही कोणत्याही महापुरुषांच्या घराण्यातील व्यक्तिमतवाबद्दल अनुदगार काढू नये अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक अश्या प्रवृत्तींना ठेचून काढेल असा इशाराही डॉ माकणीकर यांनी दिला.

ज्या दुर्बुद्धी असलेल्या मनुवादी औलादीची पिलावळ असलेल्या महिलेने ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द काढले त्या महिलेने फार गंभीर गुन्हा केला असून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देशातील एक प्रतिष्ठित व्यति असून आंबेडकरी जनतेसाठी श्रद्धेय असे व्यक्तिमत्व आहेत, “त्या” पांचट महिलेच्या अशोभनीय वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

सदर महिलेच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 499, 500 व 153अंतर्गत गुन्हा नोंद करूंन कठोर कायद्यानव्ये कारवाई करण्याबाबत व यापुढे असे प्रकार घडू नये या संदर्भात लवकरच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेणार असल्याचेही डॉ राजन माकणीकर यांनी सांगितले.