महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुजित भाऊ थिटे यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.27डिसेंबर):-नाळ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुजित भाऊ थिटे यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.माळशिरस तालुक्यात 2019 साली झालेल्या महापुरामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सरकारच्या नियमानुसार या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाले खरे पण शासकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे आजतागायत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासंदर्भात सोलापूर येथे नाळ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुजित थिटे यांनी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांची भेट घेतली व शेतकऱ्यांना आजतागायत भरपाई मिळाली नसून ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी असे निवेदन दिले.

सदर निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की या पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास माळशिरस तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल तरी देखील ही घटना गांभीर्याने न घेतल्यास सोलापूर येथे कलेक्टर ऑफिससमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात थिटे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत भारतीय नवदल व्यापारी अधिकारी (वर्ग 2) विश्वनाथ गायकवाड उपस्थित होते.