कानस या गावातील हाॅडंपप सहा महिण्यापासुन बंद

24

✒️प्रदीप रघूते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.27डिसेंबर):- पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, अतंर्गत गटग्राम पचायत येनस, कानस,शाहापुर,अशा तीन गावाचा समावेश असुन कानस हे 80 लोकसंख्या असलेले छोटे गाव आहे .त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर म्हणुन एक ग्रा.पं.थलावर विहीर आहे.आणि ती विहीर गावाच्या एका बाजुला असल्याने रात्री सहा नतंर त्या ठिकाणी सरपटणाल्या प्राण्याची दहशत पसरली आहे..

म्हणुन सर्वात जास्त कानस येथील नागरीक त्या हाॅन्डपंपवर अवलबुन आहे.प्रसाकीय राजवट असतांना तेथिल हर्षद दंधे यांनी सचिव यांना तोडी सागितले असता त्यावर 3 महिण्याचा कालावधी होउण सुध्दा हॉन्डपंप दुरुस्त न.झाल्याने त्याचं गावातील.जगदिश बारसे, स्वप्णिल महल्ले, उज्वल धवने, कुमार मोहड,यांनी पचायत समिती नांदगाव खंडे,येथे धाव घेतली.