सौ कल्पना शिवाजी भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार प्रदान

33

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.28डिसेंबर):-सौ कल्पना भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, दौंड, जि. पुणे यांच्यावतीने या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘ राज्यस्तरीय कतृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार देणेत आला. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष,माजी आमदार रमेशअप्पा थोरात, विद्यमान आमदार राहूल कुल, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.सौ कल्पना भाईगडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, कोजिमाशिचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रदेश उपाध्यक्षा रोहिणी पवार, सुभाष भोसले, दिपक जाधव, प्रा दिनेश पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. श्री जितेंद्र सावंत यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार रमेशअप्पा थोरात, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख,शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, आदी.