बाभळी बंधा-याच्या सुरक्षा बांधाला पडल्या भेगा

25

🔹गेट क्र.८ मधील दरवाजाला पडले भगदाड

🔸भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.28डिसेंबर):- येथून जवळच असलेल्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधा-याच्या सुरक्षा बांधाला भेगा पडण्याबरोबरच बंधाऱ्याच्या गेट क्र.८ च्या पायाला मोठे भगदाड पडल्याने गेट बंद असुनही खालच्या बाजूने मोठा पाण्याचा प्रवाह सुरू आहे.तसेच बाभळी बंधा-याची सुरक्षा बांधाला व बंधा-यावरील रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

तत्कालीन आंध्रप्रदेश व आत्ताचे तेलगंणा आणि महाराष्ट्र राज्यातील वादाने गाजलेला बहुचर्चित बाभळी बंधारा हा तेलगंणा सीमेपासुन अवघ्या सात किलोमीटर आत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे बांधण्यात आला.बाभळी बंधा-याची क्षमता २.७४ टीएमसी एवढी आहे. यावर्षी मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ आँक्टोबर रोजी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आल्याने बंधाऱ्यात आजघडीला मुबलक पाणीसाठा आहे.

बाभळी बंधा-यावर राज्य शासनाने २५० कोटी रूपये खर्च केले.गत सात वर्षापूर्वी उदघाटन झालेल्या बंधा-याची प्रशासनाकडून योग्य देखभाल होत नसल्याने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

प्रशासनाकडून योगय देखभाल होत नसल्याने गेट क्र.आठच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडले असुन तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु आहे.हे भगदाड भविष्यात मोठे झाल्यास बाभळी बंधा-यावर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधालाही तीन फुटापर्यंत भेगा पडल्याने भविष्यात या भेगांची खोली वाढली तरबांध तुटून बंधा-या खालील गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे.

◆बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वा-यावर
दोन राज्यातील वादाने बहुचर्चित असलेला बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा मात्र वा-यावर आहे.बंधा-याचे तसेच पाटबंधारा विभागाचे सक्षम अधिकारी दररोज उपस्थित राहत नसल्याचे दिसते.एकच डे-नाईट वाँचमन बाभळी बंधाऱ्याची अल्प मानधनावर सुरक्षा करीत आहे.बंधा-याला जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत.या झाडी-झुडपाची मुळे बंधा-यात शिरून भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने बंधाऱ्याची सुरक्षितता व सद्यस्थितीतील बंधा-याची परिस्थिती यावर उच्चस्तरीय समिती नेमुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

◆याबाबत बाभळी बंधाऱ्याचे शाखा अभियंताए एस.बी.देवकांबळे यांना विचारणा केली असता,बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधाला व तसेच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तसेच गेट क्र.८ च्या दरवाजामधील बुश मधील रबर निघल्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. याबाबत संबंधित कंत्राटदारास सुचना दिली असुन लवकरच त्याच्या दुरूस्तीचे काम होईल अशी माहिती एस.बी.देवकांबळे यांनी दिली.