✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.28डिसेंबर):-श. प्र. शहरात बनवत चावीचा वापर करून करीत रेनॉंल्ट क्विड गाडी चोरून नेल्याच्या आरोपावरून ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, बलदेवसिंग पदमसिंग राजपूत वय २८रा. हरचंद नगर दोंडाईचा दि.२७ रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर उभी असलेली रेनॉल्ड क्विड गाडी क्रमांक जी. जे. १५ सी. एफ. ६६९७ घराच्या अंगणात लावलेली होती. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चौकात चार ते पाच लोक गप्पागोष्टी करीत बसलेले असताना एका डस्टसन गाडी क्रमांक एम.एच ०२ ई. के. २१९५ मध्ये अज्ञात पाच ते सहा इसम अंगणात उभी असलेली माझी गाडीला त्यांच्या कडील बनावट चावीच्या साहय्याने गाडी चोरी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना गल्लीतले लोकांनी पाहिले.

असता त्यांना पकडून ठेवले सदरची माहिती दोंडाईचा पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनी वरुन कर्मचारी यांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपी लक्ष्मण ईश्वर ठाकरे धुरुभाईवाडी ता. जि. नवसारी (गुजरात), प्रविण संजयसिंग गिरासे, आरावे ता. शिंदखेडा ज्ञानेश्वर आनंदसिंग गिरासे, रा. आरावे ता. शिंदखेडा हे पोलीसांच्या ताब्यात आहे.

यांच्या सोबत असलेले काही साथीदार पळून गेलेल्यांमध्ये भगतसिंग उर्फ भानू इंद्रसिंग गिरासे रा. अंबाजी नगर विजलपुर ता. जि. नवसारी (गुजरात) बाबु पूर्ण नाव माहीत नाही, रा. डी. डी. गर्स स्कुल जवळ नवसारी (गुजरात) प्रकाश गिरासे रा. सहयोग सोसायटी विजलपूर ता. जि. नवसारी हे पळून जाण्यास यशस्वी झाले आहे. सदरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बीट हवालदार उमेश चव्हाण करीत आहे..

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED