✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.28डिसेंबर):– शहरात दुचाकीवर सुसाट ट्रिपल सीट पिरणाऱ्यांची संख्या चांगलीच फोफावली होती. याची दखल परिविक्षाधीन पोलीस पंकज कुमावत यांनी घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २८ रोजी स्टेशन भागात बस स्थानक जवळ येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणारे सुसाट वेगाने फिरणारे तसेच दुचाकी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे आदी कडून दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.

सदरच्या कार्यवाहीचे सुज्ञ नागरिकांकडून कौतुक होत आहे. ही कार्यवाही पोलीस कर्मचारी सुजित पाटील, मोहन माळी, होमगार्ड प्रविण बैसाणे आदी उशिरापर्यंत सुरू होती..

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED