शेतमजूरीसाठी जाणाऱ्या दोन महिलांचा मृत्यु

35

🔺टिप्परचालक शेख जावेद नुरुद्दीन यास पोलिसांनी घेतले ताब्यात

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.28डिसेंबर):-जवळच असलेल्या सावली(वाघ) शिवारात ऑटो व टिप्परच्या धड़केत एका शेतमजूरीसाठी जाणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यु झाला तर दूसऱ्या एका सहप्रवासी शेतमजूर महिलेचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.२७ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान घडली.घटनास्थळी मृत झालेल्या महिलेची ओळख चिंधाबाई मारोती कातरे (५०) अशी आहे तर सेवाग्राम रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची संगीता बबन कापटे(४८) अशी ओळख आहे.

सदर दोन्ही महिला शहरातील संत चोखोबा वार्ड येथील रहिवासी आहेत.या अपघातात ऑटोचालक पिंटु उर्फ शेख शाहिद शेख हारून(३०)याचेसह ९ प्रवासी ऑटोने हिंगणघाट येथून नंदोरी मार्गाने सेलु(मुरपाड)येथे जाण्यास निघाले असता नंदोरी येथून चुरीची भरती घेऊन येणाऱ्या टिप्परने ( एमएच ३२-एजे-२६०९) ऑटोरिक्शा (एमएच ३२- सी-९६१४)ला जोरदार धडक दिली.यात ऑटोमधील शेतमजूरीसाठी निघालेल्या हिंगणघाट येथील २ महिला मृत्युमुखी पडल्या तर इतर सहा महिलांचा जखमीमधे समावेश आहे.

उपरोक्त अपघातात सर्व शेतमजूरीकरीता जाणाऱ्या महिलांचा समावेश असून जखमी महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत,(१)पुष्पा शंकर मेकलवार(४०) (२)शारदा रामदास कंडे (३०) (३)कुसुम प्रकाश मून (५३), (४)मंदा विलास तिवाड़े (५०), (५)गायत्री बबन कापटे (२०),कमला सोपान मातकर (६०) सर्व रा.हिंगणघाट या सर्व महिला कापूस वेचणीचे कामाकरीता श्री बोरकर यांचे सेलु (मुरपाड) येथिल शेतात जाण्यासाठी निघाल्या होत्या.

परंतु दुर्दैवाने त्याचे वाहनाला अपघात झाला.
अपघात झाल्याची वार्ता कळताच रस्त्याने जाणारे प्रवासी व गावकरी घटनास्थळी पोचले,यात टिप्परचालकाची चूक असल्याचे जमावाचे लक्षात येताच संतप्त जमावाने टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिस कुमक तेथे आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.सदर घटनेतील टिप्परचालक शेख जावेद नुरुद्दीन (३६) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिषेक बागड़े हे करीत आहेत.