✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.28डिसेंबर):-अरण (ता. माढा) येथे श्री. लक्ष्मण मारुती दांडगे रा. संत सावता माळी पेट्रोल पंपामागे अरण (ता.माढा) यांच्या राहत्या घरी दि. २५/१२/२०२० रोजी मध्य रात्री चोरी झाली. दिवसभर शेतामध्ये काम करुन रात्री दांडगे परिवार गाढ झोपेत होते.

त्यावेळी घराची कडी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला, आणि श्री. दांडगे याच्या खिशातील १,२०,००० रु. व टेबलच्या ड्राॅवरमधील ५ तोळ्याचे दागिने चोरुन नेले.

पहाटे ४च्या सुमारास श्री. दांडगे व त्यांच्या मुलाला जाग आल्यावर घरात चोरी झाल्याचे आढळून आले. श्री. दांडगे यांनी लगेच टेभूर्णी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पुढील तपास पो. नि. श्री. केंद्रे साहेब करत आहेत.

क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED