श्री मकाई सह. साखर कारखान्याच्या आसवणी ( डिस्टीलरी ) प्रकल्पातून तयार झालेल्या स्पिरिटच्या पहिल्या पाच टँकरचे पुजन

34

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.29डिसेंबर):-श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याने नवीन चालू केलेल्या आवसणी ( डिसलरी) प्रकल्पातून निघालेल्या स्पिरिटच्या पहिल्या ५ टॅंकरचे पूजन कारखान्याचे चेरमन करमाळा तालुक्याचे स्वाभिमानी नेते श्री. दिग्विजय (भैय्या) बागल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना ही या प्रकल्पाचा फायदा होईल.असा विश्वास श्री. बागल यांनी बोलून दाखवला.

यावेळी श्री. बागल म्हणाले की कारखाना चालू करताना बर्याच अडचणी आल्या, त्या सर्व अडचणीवर मात करुन स्व. मामांच्या आर्शीवादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण कारखाना चालू केला, आणि जिल्ह्यात सर्वाधिक पहिली उचल दिली.यापुढे ही शेतकर्यांना न्याय देण्यासाठी श्री. मकाई सहकारी साखर कारखाना कटीबद्ध असेल असेही श्री. दिग्विजय (भैय्या) बागल म्हणाले. तसेच सर्व कामगार वर्गाचेही आभार व्यक्त केले.
यावेळी व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब पांढरे, संचालक नंदकुमार भोसले. रामचंद्र हाके, महादेव गुंजाळ, महादेव सरडे. प्रविण सरडे, दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी संचालक एच.पी. खाटमोडे..उपस्थित होते.