✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.29डिसेंबर):- आज दि.28/12/2020 रोजी रात्रि ९:०० वाजता धुळे सिविल हॉस्पिटल मध्ये जाऊन महिला प्रसुतीगृह येथे दूर गावावरून आलेल्या थंडीपासुन बचाव होण्यासाठी तेथील पेशंट तसेच पेशंट चे नातेवाईक यांना ब्लँकेंट तसेच गरम शाल वाटप करण्यात आले.

एक हात मदतीचा या उपक्रमासाठी धुळे येथील वीरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ति सामाजिक संस्थेच्या वतीने महिला वाट् अप गृप वरआवाहन आवाहन केल्यानंतर शिरपुर येथील सौ सीमा रंध्रे, सौ सारीकाताई रंध्रे, सौ नीता सोनवणे, धुळे येथील सौ मिना दोडे, सौ भारती गोयर, श्रीमती माधुरी शुक्ल या महिला भगीनींनी ब्लँकेंट उपलब्ध करून दिले त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सौ गीतांजली कोळी, श्रीमती माधुरी शुक्ल, रवींद्र कोळी यांनी चक्कर बर्डी येथील सिविल हॉस्पिटल येथे जाऊन गरजूंना या उबदार ब्लँकेंट चे वाटप केले….

झलकारी बाई संस्था कोणतेही अनुदान नसतांनाही लोकसहभातून गेल्या न ऊ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे.एक हात मदतीचा या उपक्रमाबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED