नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी “क्वेस्ट फॉर जस्टिस” या पुस्तकाचे आढावा बैठकीत प्रकाशन

30

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.29डिसेंबर):-नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीएन (डि एम जे) एन.सी.डी.एच.आर. व अॅट्राॅसिटी कायदा सशक्तीकरण राष्ट्रिय महासंघ या संस्थेच्या वतीने “आस न्यायाची”, “क्वेस्ट फॉर जस्टीस ” या इंग्रजी अहवालरूपी पुस्तकाचे प्रकाशन आढावा बैठकीत संपन्न झाले.

या प्रकाशन सोहळ्यास नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीजचे महाराष्ट्र महासचिव अॅड डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र च्या प्रा रमाताई अहिरे, राज्य सचिव वैभवजी गिते,अॅपल खरात,बि पी लांडगे,बौध्दीसत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, पंचशिला कुंभारकर, प्रमोद शिंदे, बाबासाहेब सोनावने,दादा जाधव, विनोद रोकडे,वर्षा शेरखाने,शरद शेळके,संजय माकेगावकर,दिलीप आदमाने, आदींची उपस्थिती होती. क्वेस्ट या पुस्तकाची माहिती देताना अॅड केवल उके म्हणाले की गेल्या दहा वर्षांतील अनुसुचित जाती अनुसुचित जमाती ( अ प्र ) कायदा( क्वेस्ट फाॅर जस्टीज ) अंमलबजावणी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

या अहवालात संपूर्ण भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती कारणे अत्याचाराच्या घटनेची आकडेवारी सह जातियतेची प्रखरता,जातीय अत्याचाराचे प्रकार आणि पोलिस प्रशासनाची भूमिका न्यायालयाची अॅट्राॅसिटी कायदा अंमलबजावणी बाबतची भूमिका पिडीत साक्षिदाराच्या अधिकाराची सध्या स्थिती व या संदर्भातील कायद्या अंतर्गत असलेल्या अंमलबजावणी यंत्रणेची कार्यक्षमता जादा बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

या व्यतेरिक्त अॅट्राॅसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करीता केंद्र व राज्य सरकारने पुरेशी आर्थिक तरतूद करून इतर काही महत्त्वाच्या सूचना सुध्दा या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.आणखी महत्वाची बाब म्हणजे या अहवालात मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 1 आॅक्टोंबर 2019 रोजी अॅट्राॅसिटी कायद्या बाबतच्या आदीचा दिनांक 20 मार्च 2018 च्या निर्णयाचे खंडन करून कायद्या बाबतची संभ्रमणता दूर करून अनुसूचित जाती जमाती च्या (अ प्र ) सुधारित महत्व व गांभीर्य पूर्वी प्रमाणेच असल्याचे सुचित करण्याचा निवाडा अनुकरण केले आहे.

लाॅकडाऊन च्या काळात आॅनलाई झूम अॅप द्वारे नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज चे राष्ट्रीय महासचिव रमेशजी नाथन दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली क्वेस्ट फाॅर जस्टीज या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.या आॅनलाई प्रकाशन सोहळ्यास आशिया फोरमचे अध्यक्ष पॉल दिवाकर,भारतीय दलित अभ्यास संस्था छत्तीसगडचे सुश्री ममता कुजूर,तामिळनाडू पीपल्स वॉच चे कार्यकारी संचालक दलित आर्थिक आंदोलन सरचिटणीस बिना पॉल्पिकल,ॲड.राहुल सिंग, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्रचे महासचिव अॅड.केवल उके, तसेच अनेक मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत “क्वेस्ट फॉर जस्टीस”अहवाल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.