हक्काच्या घरकुलासह इतर मागण्या घेऊन बेरोजगार दिव्यांगांचे मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण सूरू

25

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी):-7757073260

नांदेड(दि.29डिसेंबर):-केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल बेरोजगार दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असते परंतु महानगरपालिका नांदेड कडुन बेरोजगार अंध दिव्यांगांच्या अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवरच घाला.

घालण्यात आला असल्यामुळे उपोषण कर्ते नागनाथ कामजळगे आणि संजय सोनुले या बेरोजगार दिव्यांगांकडुन आज टोकाचे पाऊल ऊचलत हक्काच्या घरकुलासह रोजगारासाठी २०० सक्वेर फुट जागा आणि दिव्यांग अणुशेषासह दिव्यांग सुधारीत कायदा 2016 ची अंमलबजावणी या मुख्य मागण्या संदर्भात आज दि 28 डिसेंबर 2020 रोजी महानगरपालिका नांदेड समोर कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणाला दुर्लक्ष केल्यास स्वहस्ते सरणं रचुन आत्मदहन करणार असल्याचे तसेच यास सर्वस्वी जिल्हा प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे उपोषण कर्ते नागनाथ कामजळगे आणि संजय सोनुले या बेरोजगार दिव्यांगांनी म्हटले आहे.

आजच्या या उपोषणाला जाहिर पाठिंबा देऊन सहभागी राहुल साळवे.देविदास बद्देवाड.शेख आलीम.विठ्ठल सुर्यवंशी.संभाजी सोनाळे.कार्तिक भरतिपुरम.भाऊसाहेब टोकलवाड,आतिक हुसेन.साहेबराव कदम.राजकुमार देवकर.शिवाजी सुर्यवंशी,सय्यद आरिफ.शंकर गिमेकर,अजय गोरे.संजय वावळे.व्यकंट देवकर.मुंजाजी कावळे.प्रशांत गायकवाड.रमेश लंकाढाई.संदिप घुगे.पांडुरंग तांदळवाड.पुंडलिक गारोळे.सिद्धोधन गजभारे.प्रशांत हणमंते.मनोहर पंडित.अंबादास धोत्रे, देवेंद्र खडसे, हणमंतराव राऊत,नागेश निरडी.मोहमद आखील, गोविंद बोड्डेवार, राहुल गिते.संघरत्न सोनाळे.विश्वनाथ हंबर्डे.सय्यद हाकिम.दत्ता पाणपट्टे.सविता गवटे.कमलबाई आखाडे.शोभा सोनुले.वैशाली आटकोरे.बेबी जोगदंड यास्मीन बेगम यांच्यासह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते.