✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.29डिसेंबर):-भागातील अधिकारी,कर्मचारी आपले कुंटुबियांन सोबत सण उत्सव साजरे न करता आरोग्याची,कुटुंबियांची व जिवाची पर्वा करता कमी वेतन असुनही १२ ते १६ तास सेवेचा ताण,मानसिक तणावाखाली सतत २४ तास सेवा देत आहे.पोलीस विभागाला होत असलेल्या समस्या साठी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर कार्यरत आहे.यांचेच अच्युत साधुन पश्चिम महाराष्ट्र राज्य विभागातील फलटण येथे आज दिनांक रोजी 29.2020 रोजी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष- डॉ. संघपाल उमरे यांच्या आदेश्याने,पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हाजी अस्लम,पश्चिम महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख माधुरीताई गुजराती व सुभाष गायकवाड़ यांच्या मार्गदर्शनाखाली फालटण तालुका अध्यक्ष महादेव गायकवाड यांनी सदर बैठक आयोजित केली.समितीची पोलीस विभागाला होत असलेल्या समस्या साठी कार्य पध्दती,ध्येय धोरणाबाबत,संघटन जिल्हा, व तालुका स्तरावर बांधनी,गाव तिथे समितीचे कार्यलय,फलक,व ईतर महत्वपूर्ण बाबीवर सखोल चर्चा करण्यात आली.

सातारा जिल्हा व तालुका स्तरावर नविन नियुक्त्या करुन नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनदंन करण्यात आले.फलटण तालुका अध्यक्ष महादेव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक नियोजित केली.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हाजी अस्लम,पश्चिम महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख माधुरीताई गुजराती,सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज भोसले, सातारा जिल्हा सरचिटणिस बी.आर.गायकवाड,सातारा जिल्हा सल्लागार कृष्णात केंजले यांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष घाडगे यांनी तर प्रास्ताविक सातारा जिल्हा अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केले.सातारा जिल्हा महिला अध्यक्षा प्रियंकाताई जाधव यांनी आभार व्यक्त केले.
सातारा जिल्हा महिला समिती कार्यध्यक्षा- वैशाली गायकवाड,सातारा जिल्हाउपाध्यक्षा-चित्रा गायकवाड,फलटण शहर महिला अध्यक्षा-सपना भोसले,फलटण शहर अध्यक्ष संजय गायकवाड,फलटण शहर सचिव मंगेश आवळे ,फलटण शहर उपाध्यक्ष इम्तियाज काझी,फलटण तालुका उपाध्यक्ष माफी सलीम शेख,माण तालुका महिला समिती कार्याध्यक्षा बायडाबाई अवघडे,माण तालुका महिला समिती सचिव साधना खरात,खटाव तालुका अध्यक्ष विश्वास जगताप,राजेंद्र आवटे,लक्ष्मण खरात शरद शिंदें आदी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सातारा जिल्हा,फालटण,माण तालुक्यातील व परिसरातील सर्व पदधिकाऱ्यांनी मेहनत घेतली
महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED