✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.30डिसेंबर):- महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायदयाचा मसुदा तयार करण्याकरीता शक्ती कायदा बनविणाऱ्या समितीची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मा. अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

यावेळी श्री. अनिल परब, संसदीय कार्यमंत्री, आमदार प्रणिती शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोजा अहिरे, श्वेता महाले, डॉ. भारती लवेकर, यामीनी जाधव या सदस्यांची उपस्थिती होती.

यामध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकरीता शक्ती कायदा अधिक सशक्ती बसविण्याकरीता योग्य ती तरतुद करण्याकरीता विचार विनीमय करण्यात आले. सदर बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली उपस्थिती नोदवून शक्ती कायदा अधिक मजबूत होण्याकरीता आपले मत मांडले.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED