✒️ठाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

ठाणे(दि.30डिसेंबर):-प्रतिभावंत जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे  यांचे पहिलेच पुस्तक शारदा प्रकाशन ठाणे यांनी प्रकाशित केलेल्या जीवन संघर्ष या पुस्तकावर कमीत कमी वेळेत विविध मान्यवरांनी लिहिलेली ८१ परीक्षणे दर्जेदार वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिक, इ. मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात असे भरघोस यश मिळालेले कवी नवनाथ रणखांबे यांचे पहिलेच एकमेव पुस्तक असून ‘जीवन संघर्ष’ हे तुफान गाजले आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे जीवन संघर्ष पुस्तकाची ‘महाराष्ट्र बुक रेकॉर्ड’ 2020′ मध्ये ऐतिहासिक ‘राष्ट्रीय विक्रमाची’ नोंद झाली असून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने त्यांना सन्मानित केले आहे.

मराठी साहित्य क्षेत्रात ही बाब अभिमानास्पद, गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे.विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या जीवन संघर्ष पुस्तकाला मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. तसेच इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यापूर्वी ऐतिहासिक विक्रम होऊन नोंद झाली आहे. नवनाथ रणखांबे हे डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड धारक ही आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED