✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.३०डिसेंबर):- उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे, भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात नगरपालिका व तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने, एकूण १०३ लोकांनी रक्तदान केले.

या प्रसंगी, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चन्द्रे, नायब तहसीलदार सुदाम महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण , उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, डॉ. हितेंद्र देशमुख, शासकीय भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील, डॉ. मेघा अडचीत्रे आणि सर्व कर्मचारी तसेच उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील उज्ज्वला मोरे, योगेश पवार, हेमा पवार, विजय पाटील, धीरज डोळे, सलमान खान, गजेन्द्र नेरपगार, अमृत माळी व कमलेश ठाकूर, हे उपस्थित होते. डॉ. ललितकुमार चन्द्रे यांनी, “रक्तदान हे श्रेष्ठदान” आहे.

असे सांगताना, रक्तदान करण्यास कोणीही न घाबरता, येणाऱ्या काळात, सर्वांनी रक्तदान करावे. रक्तदान करण्याने, आज पर्यंत कोणालाही , काहीही त्रास झालेला नाही किवा होत नाहीं, असे विनम्र आव्हाहन केलें. शिबिर संपल्यावर त्यांनी तहसील कार्यालय, नगरपालिका, सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार वर्गाचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED