🔹प्रभाग रचनांची अधिसुचना प्रसिध्द

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.30डिसेंबर):- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी गडचिरोली जिल्हयातील नगर पंचायत अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची यांच्या प्रभाग रचना व सदस्य पदाच्या आरक्षणाबाबतची अंतिम अधिसुचना दिनांक 30 डिसेंबर 2020 पर्यंत प्रसिध्द करण्याबाबत निर्देश दिले होते.

आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर यांनी सदर नगर पंचायतीच्या प्रभाग रचना व सदस्य पदांच्या आरक्षणाला अंतिम मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर प्रभाग रचना व सदस्य पदाच्या आरक्षणाची अधिसुचना मराठी व इंग्रजी स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत नागरिकांना अधिसुचना उपलब्ध होईल असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोली, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED