✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.31डिसेंबर):-राज्य राखीव दलातील एका जवानाची कर्तव्य बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 29 रोजी सकाळी ही घटना घडली. दीपक लक्ष्मण कोकणी (बक्कल क्रमांक 638 रा. नंदुरबार) असे या जवानाचे नाव असल्याचे राखीव दलाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत राखीव दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान दीपक लक्ष्मण कोकणी हे नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असताना सायंकाळी अचानक हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकाराची माहिती राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पत्तागुडम या पोलिस ठाण्यात ही देण्यात आली.दरम्यान मयत जवान दीपक कोकणी हे मूळचे नंदुरबार येथील रहिवासी आहेत. कोल्हापूरच्या राज्य राखीव पोलीस दल 16 मध्ये सन 2014 मध्ये ते भरती झाले होते.

आत्तापर्यंत त्यांनी नक्षलग्रस्त भागात तसेच देशातील विविध राज्यातील निवडणूकांमध्ये बंदोबस्त केला आहे. राखीव जगातील अत्यंत मनमिळावू जवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या या मृत्यूच्या घटनेने राज्य राखीव पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.यासंदर्भात राज्य राखीव पोलीस दल कोल्हापूर 16 चे सहाय्यक समादेशक शिवाजीराव जमदाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी दिलगिरी व्यक्त करत अधिक माहिती दिली.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED